Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Shayari | Marathi Kavita | Marathi Shayari Images


Marathi Shayari ,Marathi Kavita ,Marathi shayari Images, Marathi kavita with images, Marathi Poetry, Marathi Love shayari, Marathi Cha Jag, Whatsapp shayari, Status, Facebook Wallpapers

 ही अखेरची तुझी आठवण
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही…

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं
माझ्या मनात बरसणार नाही…..

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस
माझ्या मनाच्या अंगणात
रिमझिमणार् नाही….!

तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर…!

म्हणूनच, हे अखेरचे काही अश्रू,
फक्त तुझ्यासाठी…
पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली
तुझ्यासाठी जमणार नाहीत…

आणि हे अखेरचे काही शब्द ,
फक्त तुझ्यासाठी…

पण यापुढे माझ्या कविता
तुझ्या आठवणी मागणार् नाहीत…

यापुढे कधीही माझ्या कविता
तुझ्यासाठी असणार् नाहीत…

ही अखेरची तुझी आठवण…
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार् नाही…!

Post a Comment

0 Comments